। पनवेल । वार्ताहर ।
ओळखीच्या व्यक्तीकडून दागिन्यांची लूट झाल्याची घटना आदई येथील बालाजी स्प्लेंडर इमारतीमध्ये घडली आहे. तालुक्यातील आदई येथील बालाजी स्प्लेंडर इमारतीमध्ये राहणारे दाम्पत्य तीन दिवसांपूर्वी कामावर गेले होते. त्याच दिवशी त्यांच्या घरी गावावरून आलेला त्यांचा चुलत भाऊ होता. कामावरून घरी आल्यावर त्यांचा भाऊ त्यांना दिसला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना घरातील सोन्याचे दागिने ठेवलेल्या जागेवर सहा लाखांचे दागिने सापडले नाहीत. अखेर या दाम्पत्याने खांदेश्वर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली.







