। पनवेल । वार्ताहर ।
एसबीआय बँकेचे एटीएम कार्डचे क्लोनिंग करून क्लोन केलेल्या एटीएम कार्डच्या सहाय्याने बँकेच्या खात्यातून 57,523 रुपये रक्कम लबाडीने काढून घेतल्याची घटना पनवेल परिसरात घडली आहे. फसवूणक झालेल्या व्यक्तीचे नाव हनुमंत काळभोर (66) असे आहे. याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.






