उपजिल्हा रुग्णालयात रोबोटिक सर्जन

डॉ. सागर खडसे अस्थिरोग तज्ज्ञ


| पनवेल | प्रतिनिधी|

पनवेल उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सागर खडसे अस्थिरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. त्यांची रोबोटिक सर्जन म्हणून ओळख आहे. साऊथ कोरिया येथून शिक्षण घेतलेल्या खडसे यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हाडांच्या अनेक सर्जरी केल्या आहेत. सर्वसामान्य रुग्णांना त्यांचा फायदा होणार आहे. पनवेल उपजिल्हा रुग्णालय मोठ्या प्रमाणात हाडांचा विकार असणारे रुग्ण येतात. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने खास आर्थोपेडिक सर्जन नियुक्त केलेला आहे. दरम्यान, डॉ. सागर खडसे हे ऑर्थोपेडिक ट्रॉमा जॉईन रिप्लेसमेंट तसेच रोबोटिक सर्जन आहेत. त्यांनी वेगवेगळ्या शासकीय आणि खासगी रुग्णालयात याअगोदर काम केले आहे. त्याचबरोबर साउथ कोरिया येथून प्राथमिक आणि पुनरावृत्ती हीप आणि नी रिप्लेसमेंट त्याचबरोबर रोबोटिक सर्जरीमध्ये फिलोसॉफी मिळवली आहे. रोबोटिक सर्जरी ही अत्यंत अचूक त्याचबरोबर कमी जखम होणारी असते, यातून रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. याव्यतिरिक्त अशा प्रकारच्या सर्जरीतून रुग्णांना जलद गतीला रिलीफ मिळतो. ही सर्जरी मुंबईतील काही रुग्णालयांमध्ये करता येतात.

याबाबत फारशी जनजागृती नसल्याने या शस्त्रक्रिया पद्धतीला फारसा प्रतिसाद मिळत नाही. मात्र, ही पद्धत अत्यंत गुणकारी तसेच वेदना कमी करणारी आहे. यामध्ये पारंगत असणारे डॉक्टर पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले आहे. त्यांच्या माध्यमातून अस्थिरोग असणाऱ्या रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर शस्त्रक्रियासुद्धा करता येणार आहेत. पनवेल उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या अस्थिरोग विकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांवर अत्यंत अचूक पद्धतीने उपचार होणार आहेत.

Exit mobile version