। पॅरिस । वृत्तसंस्था ।
पॅरिसमध्ये 28 ऑक्टोबर रोजी 68 वा बॅलन डी’ओर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी पॅरिसमध्ये अनेक आजी-माजी दिग्गज फुटबॉलपटूंनी हजेरी लावली होती. या दिमाखदार सोहळ्यात मानाचा डी’ओर पुरस्कार देण्यात आला. यंदा पहिल्यांदाच दिग्गज लिओनल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नाही. दरम्यान, यंदा डी’ओर पुरस्काराचा मानकरी स्पेन आणि मँचेस्टर सिटी एफसी क्लबचा रोद्री हा ठरला आहे. त्याने हा पुरस्कार रियल माद्रिदच्या विनिसियर ज्युनियर आणि ज्युड बेलिंगघम यांना मागे टाकत जिंकला असून रोद्री हा मँचेस्टर सिटीचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच, लुका मॉड्रिकनंतर हा मानाचा पुरस्कार जिंकणारा रोद्री पहिला मिड-फिल्डर आहे.