रोहा न्यायालयाचा कारभार होणार पेपरलेस

ई-फाईलिंग केंद्राचे न्या. महाले यांच्या हस्ते उद्घाटन

| नागोठणे | वार्ताहर |

मा. सर्वोच्च न्यायालयाची संकल्पना व निर्देशानुसार सर्वच न्यायालयांतील कारभार आता पेपरलेस होणार आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक न्यायालयांत वकील व पक्षकरांसाठी ई-फाईलिंग कार्यप्रणाली सुविधा केंद्र सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये आता रोहा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे नावही समाविष्ट झाले आहे. रोहा न्यायालयातील ई-फाईलिंग सुविधा केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (दि.3) रोहा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुनील एस. महाले यांच्या हस्ते व सहन्यायाधीश मेघा हासगे, रोहा वकील संघटनेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नानासाहेब देशमुख, रायगड जिल्हा ई-फाईलिंगचे प्रमुख ॲड. अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यामुळे वकील व पक्षकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मा. उच्च न्यायालय, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन, ए.आय.आर. व्हिजन इन्फिनिटी प्रा. लि. व रोहा वकील संघ यांच्या सहकार्याने ही ई-फाईलिंग कार्यप्रणाली सुरु करण्यात आली आहे. रोहा न्यायालयातही ई-फाईलिंग सेवा व फॅसिलिटी सेंटर सुरु झाल्याने आता दाखल होणारी नवीन प्रकरणे (खटले) ऑनलाईन पद्धतीने दाखल करणे सोपे होणार आहे. यासाठी ई-फाईलिंग सुविधा केंद्रात संगणक, स्कॅनर, प्रिंटर, वेब कॅमेरा व इतर उपकरणे बसविण्यात आली आहेत. या केंद्रात वकिलांच्या मदतीसाठी संगणक परिचालक म्हणून आकांक्षा गोविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला न्यायालयाच्या सहाय्यक अधीक्षक आरती दिवेकर, सहाय्यक सरकारी ॲड. अभियोक्ता विनोद म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता व्ही.आर. बागुल, रोहा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. नानासाहेब देणसमुख, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हेमंत गांगल, ॲड. सुनील सानप, ॲड. मनोजकुमार शिंदे, ॲड. धनंजय धारप, ॲड. समीर सानप, ॲड. एम.के.शिंदे, ॲड. दिनेश वर्मा, ॲड. महेश घायले, ॲड. एस.ए. हाफिज, ॲड. दिपक सोलंकी, ॲड. अजित दांडेकर, ॲड. महेश पवार, ॲड. संदीप भोसले, ॲड. ओमकार शिलधनकर, ॲड. महेंद्र धामणे, ॲड. प्रतिक पाटणकर, महिला वकील ॲड. मीरा पाटील, ॲड. मीनल मनोहर, ॲड. प्रणाली पाटणे, ॲड. देवयानी मोरे, ॲड. कविता मोरे, ॲड. शीतल सानप, ॲड. दिव्या सावंत, ॲड. वैभवी शिंदे, ॲड. स्मिता कुथे, ॲड. प्रतिक्षा पाटील, ॲड. प्राजक्ता पाटील, ॲड. विजया गोडबोले उपस्थित होते. यावेळी जिल्हा ई-फाईलिंगचे प्रमुख ॲड. अमित देशमुख ई फाईलिंग कार्यप्रणालीची माहिती देऊन वकिलांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमासाठी रोहा न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Exit mobile version