रोहा वनविभागाची धडक कारवाई

अंदाजे सहा लाख रुपयांची खैर लाकडाची चोरी पकडली
धाटाव | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर मोरया धाब्याजवळ खैर लाकडाची चोरी पकडण्यात आली आहे. अंदाजे सहा लाख रुपये किमतीची ही लाकडे असल्याचे समजते. उपवनसंरक्षक रोहा आप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्‍वजित जाधव यांच्या मार्गदर्शनखाली ही धडक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा कांबळी, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, वनरक्षक शेणवई तेजस नरे, वनरक्षक मेढा, योगेश देशमुख, वनरक्षक कुशेडे, किशोर वाघमारे, वनपाल माणगाव, गायकवाड व राऊंड स्टाफ माणगाव यांनी मौजे विघवली फाटा मुंबई-गोवा महामार्गावर मोरया धाब्याजवळ टाटा ट्रक क्रमांक एम एच 16 क्यू 7151 तपासले असता त्यामध्ये अवैध वृक्षतोडीचा विनापरवाना वाहतूक केलेले खैर सोलीव माल 9.225 घमी किंमत 15,530/- व ट्रक अंदाजे किंमत रुपये पाच लाख मात्र, एकूण 5,15,530/- इतका मुद्देमाल व आरोपी उमेश जयसिंग ढवळे, रा. बारामती वडगाव निंबाळकर सह जप्त केला.
त्याचप्रमाणे आजूबाजूला तपास केला असता कशेणे गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर टाटा एस क्रमांक एम.एच.06.बी.जी. 0089 मागील ताडपत्री उघडून तपासले असता सदर टेम्पोमध्ये खैर सोलीव नग 13 घमी 0.237 किंमत 3374- रुपये इतका व टेम्पो किंमत 60,000/- असे एकूण 63,374/- इतका मुद्देमाल बेवारस जमा करण्यात आला. मात्र, अद्याप पुढील तपास चालू आहे. रोहा वनविभागाच्या या धडक कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Exit mobile version