| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील क्रीडाप्रेमींसाठी आयोजित करण्यात आलेली रोहा खो-खो प्रीमियर लीग 2026 स्पर्धा मेढा येथील मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात व यशस्वीरित्या पार पडली. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत रोहा तालुक्यातील नामांकित संघांनी सहभाग घेत उत्कृष्ट दर्जाचे सामने खेळले. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत अवचितगड मेढा रोहा फायटर्स संघाने दमदार खेळ करत अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर एस.एन.एस. स्पोर्ट्स रोहा चॅलेंजर्स संघाने उत्कृष्ट खेळ करत द्वितीय क्रमांक मिळवला. तर श्री भैरवनाथ यशवंतखार रोहा वॉरियर्स संघाने तृतीय क्रमांक मिळवला आणि ओम साई राम रोहा लिजेंड्स संघाने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट रक्षण प्रतीक जंगम (अवचितगड मेढा), उत्कृष्ट आक्रमक राज देशमुख (एस.एन.एस. स्पोर्ट्स), उद्योन्मुख खेळाडू रुद्र मांडलेकर (श्री भैरवनाथ यशवंतखार), उत्कृष्ट कर्णधार ओंकार मालुसकर (ओम साई राम), सामनावीर अक्षय मोरे (अवचितगड मेढा) यांना सन्मानित करण्यात आले.याशिवाय महिला खोखो सामन्यात सह्याद्री शक्ती संघाने प्रथम क्रमांक मिळवला तर कोकण पॉवर संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे आयोजन जय बजरंग क्रीडा मंडळ, रोहा यांच्या वतीने करण्यात आले होते.







