वाट काढताना तारेवरची कसरत
। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
गेली दोन दिवसांपासुन रोहा-कोलाड मार्ग धुक्यात हरविलेला दिसून येत आहे. या धुक्यामुळे मॉर्निंग वॉक करणार्यांसाठी हा सुखद धक्कस असला तरी शाळा, कॉलेजला व कामावर जाणारे कामगारवर्ग, विविध व्यवसाय करणारे व्यवसायिक पहाटे वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
धुक्यामुळे रोहा-कोलाड मार्गावरील जैनवाडी ते किल्ला या परिसरात तर अक्षरशः हवेत मिश्रीत होणारे केमिकलयुक्त व पडलेले धुके यामुळे येणारी वाहने देखील दिसत नाही. तसेच हवेत सोडलेल्या केमिकलमुळे डोळ्यांची चुरचुरही सकाळच्या प्रहरी होताना दिसत आहे. हुडहुडी भरविणारा डिसेंबर महिना सरला तरी गुलाबी थंडीची चाहुल लागत नव्हती. परंतु उशिरा का होईना 2021 या वर्षाच्या शेवटी व जणु 2022 या वर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडीची जोरदार चाहुल अखेर हळूहळू लागत असुन बाजारपेठेत उबदार कपडे खरेदीसाठी लोकांची गर्दी दिसुन येत आहे.







