रोह्याच्या राकेशची रायगड संघात निवड

। खांब । वार्ताहर ।

जय बजरंग रोहा कबड्डी संघाचा अष्टपैलू खेळाडू कु. राकेश गायकवाड याची दि. 15 ते 17 जुलै रोजी पुणे (बालेवाडी)येथे होणार्‍या 71 व्या प्रौढ गट पुरुष राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कबड्डी संघात निवड झाली आहे.

स्पर्धेकरिता नुकतेच अलिबाग येथे 10 दिवसांचे सराव शिबीर संपन्न झाले. राकेश गायकवाड हा खेळाडू रायगड पोलीस दलात कार्यरत असून नुकत्याच झिराड येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बक्षीस देऊनही गौरविण्यात आले होते. आपल्या अंगातील मुलभूत कौशल्याच्या बळावर व तो कबड्डी खेळासाठी घेत असलेली मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे सुयश मिळविले आहे. तर रायगड प्रौढ गटात निवड झालेला जय बजरंग रोहा चा तो पहिलाच खेळाडू आहे. राकेशच्या या सुयशाबद्दल जय बजरंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अमर सलागरे यांनी राकेशच्या सुयशाबद्दल त्याचे अभिनंदन करून त्याला शुभेच्या दिल्या आहेत. तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह क्रीडा प्रेमी नागरिक यांच्याकडूनही अभिनंदन होताना दिसत आहे.

Exit mobile version