। वावोशी । प्रतिनिधी ।
पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला स्व. पार्वतीबाई सांडव चषक कबड्डी स्पर्धेसाठी वावोशी येथील प्रियांका महादू शिंदे हिची रायगड महिला संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा 19 ते 23 मार्च दरम्यान ठाणे (प.) येथील जे.के. केमिकल क्रीडांगणावर रंगणार आहे. प्रियांका रायगड महिला संघाकडून खेळत असून, तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025 साठी स्थान मिळवले आहे. या निवडीसाठी तिने राज्य अजिंक्यपद निवड चाचणी यशस्वीरीत्या पार केली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वावोशी गावासह छत्तीशी विभाग व खालापूर तालुक्यातील क्रीडाप्रेमींकडून तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. प्रियांकाच्या कामगिरीमुळे खालापूर तालुक्यासह वावोशी गावाचा क्रीडा क्षेत्रातील नावलौकिक अधिक वृद्धिंगत झाला आहे.