। पुणे । प्रतिनिधी ।
वादातून एका अल्पवयीन मुलावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्य कैलास गोयर (वय 17, रा. खडकी बाजार) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्य आणि आरोपींचा वाद झाला होता. वादातून रविवारी (दि. 16) आरोपींनी खडकीतील महादेववाडी परिसरात लक्ष्यला नेले आणि दाट झाडीत त्याला डांबून ठेवले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करुन शस्त्राने वार केले. तसेच, आमच्या नादाला लागला तर, गंभीर परिणाम होतील, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.