। रेवदंडा । प्रतिनिधी ।
नुकत्याच संपन्न झालेल्या चौल सोंडेपार प्रिमिअर लीग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी श्लोक स्पोर्ट्स संघ विजयी ठरला आहे. तसेच, श्लोक संघाचे मालक विशाल ठाकूर यांना सायकल देऊन गौरविण्यात आले आहे.
चौल सोंडेपार ग्रामस्थांच्यावतीने सोंडेपार श्याम मस्तकार क्रिडांगणात ओव्हरआर्म मर्यादीत षटकांचे टेनिस बॉल प्रिमिअर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा शुभारंभ माधव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत श्लोक स्पोर्ट्स, एस.डी. स्पोर्ट्स, श्री अंश स्पोर्ट्स, बजरंग वॉरियर्स, शंभूराजे वॉरियर्स, मोरया स्पोर्ट्स, कृष्णाई स्पोर्ट्स या आठ संघानी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्लोक स्पोर्ट्स, द्वितीय क्रमांक आदिती स्पोर्ट्स, तृतीय क्रमांक श्री अंश स्पोर्ट्स तर चतुर्थ क्रमांक एस.डी. स्पोर्ट्स यांनी पटकाविले आहे. तर, स्पर्धेत उत्कृष्ट फलदांज दिनेश म्हात्रे, उत्कृष्ट गोलदांज आस्वाद घरत, मालिकावीर मंदार मळेकर, अंतिम सामनावीर आस्वाद घरत यांची निवड करण्यात आली. विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते आकर्षक चषक वितरीत करण्यात आले. तसेच, लकी ड्रा कुपन विजेती आर्या म्हात्रे हिला भागेश सुरेकर यांच्याकडून तर उत्कृष्ट संघमालक विशाल ठाकूर यांना फ्रेंड्स ग्रुपकडून सायकल बक्षिस देण्यात आली. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रमेश ठाकूर, अभिजीत म्हात्रे, दिनेश म्हात्रे, संदिप म्हात्रे, दत्तात्रय सुरेंकर, आदी मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला. स्पर्धेत पंचाचे काम जितू बेलवडकर, जितू खोत, अश्विन गुरव, श्रेयस ठाकूर यांनी पाहिले. तर, गुणलेखन नविद मुकादम यांनी केले. सामन्याचे सुत्रसंचलन वैभव राऊत यांनी केले.