वीज ग्राहकांसाठी शेकापच्यावतीने निवेदन
| कोलाड | प्रतिनिधी |
महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांना रोहा तालुक्यात वीज ग्राहकांना न विचारता जुने चांगले मीटर बदलून स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याचा उच्छांक मांडला आहे. तर, मिटर लावण्यास घरेलू वीज ग्राहकांचा प्रचंड विरोध आहे. जनतेचा विरोध लक्षात घेऊन रोहा तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने बुधवारी (दि.13) रोहा येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधी सभा आयोजीत करण्यात आली होती. ही सभा तालुका स्तरावर शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेत स्मार्ट प्रीपेड मीटर हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून, तो महाराष्ट्रात राबवला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील गावागावात ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येत असून, याला वेळीच विरोध करण्याची भूमिका सर्व साधारण सभेत घेण्यात आली. लगेच या शिष्ठ मंडळाने नेते शंकरराव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रोहा तालुका चिटणीस शिवराम महाबळे यांच्या अध्यक्षतेखाली रोहा कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू यांना वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर न बसविण्याचे निवेदन देण्यात आले. तर, स्मार्ट ग्राहकांना सक्ती करू नये. हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असून, देखील ती पुन्हा ग्राहकावर सक्ती करत घरगुती मीटर बसविले जात आहेत. याला रोहा शेकापने कडाडून विरोध करत वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट प्रीपेड मीटर बसू देणार नाही. बसविण्याचा प्रयत्न केलात तर उग्र आंदोलन करू, असे शंकरराव म्हसकर यांनी सांगत विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता रोहा यांना निवेदन दिले. यावेळी शेकापचे राज्य कार्यकारणी सदस्य शंकरराव म्हसकर, तालुका चिटणीस शिवराम महाबळे, मजूर फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष हेमंत ठाकूर, मारुती खांडेकर, तुकाराम खांडेकर, पुरोगामी रोहा तालुका युवक अध्यक्ष संतोष दिवकर, संदेश विचारे, दीपक डाईटकर, लक्ष्मण चव्हाण, विनायक धामणे, सोहिल अधिकारी, अरविंद भिलारे आदी उपस्थित होते.







