| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णा याने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्यानंतर त्याने थांबण्याचा निर्णय घेतला. तब्बल 22 वर्षे भारतीय संघाकडून खेळल्यानंतर त्याने आता भारतीय संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी तो अद्याप व्यावसायिक टेनिस खेळताना दिसेल. त्याने आपली निवृत्ती जाहीर करताना म्हटले, “ही नक्कीच भारतासाठी माझी शेवटची स्पर्धा होती. मला माहित आहे मी सध्या कुठे आहे. अजून जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत मी खेळत राहील.”