रोहन मापुस्कर कास्टिंग दिग्दर्शक

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धनचे सुपुत्र रोहन रमाकांत मापुस्कर हे सिने क्षेत्रात कास्टिंग डायरेक्टर म्हणून गेली काही वर्षे काम करीत आहेत. त्यांनी विविध चित्रपटांचे कास्टिंग डायरेक्टर म्हणून यशस्वीपणे काम केले आहे. लवकरच मराजा महाराणा प्रताप ही आगामी वेब सिरीज तयार होत आहे. येत्या मार्च 23 पासून चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई हे या सिरीजचे निर्माते असून अभिनेते गुरमित चौधरी तीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. वेब सिरीजसाठी काम करणार्‍या कलाकारांची निवड करण्याची म्हणजे कास्टिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी रोहन मापुस्कर यांचेकडे सोपविण्यात आली आहे. रोहन मापुस्कर हे लेखक श्री. राजेश मापुस्कर यांचे नातेवाईक आहेत.

Exit mobile version