। उरण । प्रतिनिधी ।
गोल्डन ज्यूबली युनिव्हरसरी इंटरनॅशनल टूर्नामेंट अँड ट्रेनिंग कॅम्पअंतर्गत दि. 11 ते 14 डिसेंबर दरम्यान मलेशिया येथे गोशीन रियू कराटे असो. तर्फे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 84 किलो व त्या वरील वजनी गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोहित शरद घरत यांने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे.
मलेशिया येथे आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशातील एकूण 220 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गोशीन रियू कराटे असो. (इंडिया) संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत उरण तालुक्यातील नवापाडा येथील रोहित घरत याने दमदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवून भारताचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेसाठी रोहित घरत यांना सिहान. के. वसंतन, गोपाळ म्हात्रे, राजु कोळी, बळीराम घरत, राजू मुंबईकर, निकेश पाटील, राकेश म्हात्रे व आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. परदेशात जाऊन भारताचे नाव उज्ज्वल करणार्या रोहितवर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







