आयसीसीच्या सर्वोत्तम संघाचा रोहितच कर्णधार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयसीसीने एकदिवसीय 2023 चा संघ निवडला आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्माला करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या संघात रोहितसह सहा खेळाडूंचा समावेश आहे. जरी भारताने विश्वचषक जिंकला नसला, तरी आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या संघात भारतीयांचा दबदबा राहिला.

ऑस्ट्रेलियाने यंदाच्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. मात्र आयसीसीच्या संघात दोनच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा समावेश आहे. मधल्या फळीतील ग्लेन मॅक्सवेल आणि फिरकीपटू एडम झाम्पा यांचा समावेश आहे. याचबरोबर उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेल्या दक्षिण अफ्रिकेचे दोन खेळाडू या संघात आहेत. सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि अष्टपैलू खेळाडू जेराल्ड कोट्झी (12वा खेळाडू) यांचा समावेश आहे. याचबरोबर न्यूझीलंडचा डॅरेल मिचेलचा आणि श्रीलंकेच्या दिलशान मदुशान यांचा देखील संघात समावेश आहे.

आयसीसीचा सर्वोत्तम संघ:
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक, द. आफ्रिका), रोहित शर्मा (कर्णधार, भारत), विराट कोहली (भारत), डॅरिल मिचेल (न्यूझीलंड), केएल राहुल (भारत), ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया), रविंद्र जडेजा (भारत), जसप्रीत बुमराह (भारत), दिलशान मदुशंका (श्रीलंका), ऍडम झम्पा (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद शमी (भारत), गेराल्ड कोएट्झी (12 वा खेळाडू, द. आफ्रिका)
Exit mobile version