| मुंबई | वृत्तसंस्था |
जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगचा नवा सिझन लवकरच सुरु होणार आहे. (दि. 22) मार्चपासून आयपीएल 2024 चे बिगुल वाजणार असून चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघात उदघाटन सामना पार पडेल. आता आयपीएल सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा हा नवा सिझन खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे.
आयपीएल 2024 च्या पहिल्या सत्रातील वेळापत्रकानुसार 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान मुंबई इंडियन्स 4 सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 24 मार्च रोजी गुजरात जाएंट्स विरुद्ध अहमदाबाद येथे खेळवण्यात येईल. आयपीएल 2024 च्या सरावासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू एक एक करून होम ग्राउंडवर दाखल होत आहेत. त्यामुळे रोहित शर्मा देखील इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजनंतर आयपीएलसाठी आता मुंबई इंडियन्सच्या टीम सोबत सामील झाला आहे.