। नाशिक । प्रतिनिधी ।
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. तसेच, महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरु आहेत. आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्यात महायुतीला किती जागा मिळणार याची आकडेवारीच मांडली आहे.
महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार यावर रोहित पवार यांनी वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाला 13 ते 14 जागा, शिवसेना शिंदे गटाला 2 ते 3 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, एकूण महायुतीला 16 ते 18 जागा मिळतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.