एकदिवसीय संघाच कर्णधारपदी रोहित शर्मा

विराटला डावल्यामुळे मदन लाल यांचा संताप
। मुंबई। वृत्तसंस्था ।
चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर केला असून, कर्णधारपदाचा कमान रोहित शर्मा यांचेकडे सोपविली आहे. मात्र, यामध्ये विराटला डावलल्यामुळे माजी प्रशिक्षक मदन लाल यांनी संताप व्यक्त केला आहे.
चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने बुधवारी दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर केला. त्यावेळीच विराट कोहलीची हकालपट्टी करून रोहितची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी निवड केली. भारत-आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून त्यानंतर उभय संघांत तीन एकदिवसीय लढतीही खेळवण्यात येणार आहेत.
विराट कोहलीने आधीच टी-20 विश्‍वचषकानंतर सर्वात लहान फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. अशा स्थितीत तो आता केवळ कसोटी फॉर्मेटमध्येच कर्णधारपद सांभाळत आहे. विराटला कर्णधारपदावरून हटवणे योग्य नाही, असे मत मदन लाल यांनी व्यक्त केले.
तर दुसरीकडे जैव-सुरक्षित वातावरणात सातत्याने क्रिकेट खेळायचे असल्याने रोहितलासुद्धा विश्रांतीची गरज भासू शकते. अशा स्थितीत आफ्रिका दौर्‍यासाठी संघ रवाना होण्यापूर्वीच उपकर्णधाराचे नाव जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. सध्या तरी राहुल या शर्यतीत अग्रेसर आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या पदाधिकार्‍याने दिली.

Exit mobile version