रोहित शर्माच ‘सिक्सर किंग’

| मुंबई । वृत्तसंस्था ।

रोहित शर्मा याला हिटमॅन असंच नाही म्हटलं जात. षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्माच्या जवळपास कोणीही नाही या आकडेवारीवरूनच हे स्पष्ट होते. त्याचा हा कारनामा जवळपास 10 वर्षांपासून सुरू आहे. गेल्या 10 वर्षात रोहित शर्माने 7 वर्षात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. म्हणजेच केवळ 3 वर्षात रोहित शर्मापेक्षा जास्त षटकार इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने मारलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा इतर भारतीय फलंदाजांपेक्षा पुढे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा याने 2013 साली सर्वाधिक 30 षटकार ठोकले होते. यानंतर रोहित शर्माने 2014 मध्ये 22 षटकार ठोकले. तर 2015 मध्ये हिटमॅनने 23 षटकार ठोकले होते. रोहित शर्माने 2016 मध्ये 19 षटकार मारले होते. त्याचप्रमाणे 2017 आणि 2018 मध्ये देखील रोहित शर्माने अनुक्रमे 46 आणि 39 षटकार ठोकले होते. मात्र, 2020 हे वर्ष केएल राहुल याच्या नावावर होते. 2020 या वर्षी केएल राहुल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज होता. 2020 मध्ये केएल राहुलने 16 षटकार ठोकले होते.

त्याच वेळी, ऋषभ पंत याने 2021 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार ठोकले. या वर्षी ऋषभ पंतने 11 षटकार ठोकले. त्यानंतर 2022 मध्ये इशान किशन याने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले. 2022 मध्ये इशान किशनने 18 षटकार ठोकले. पण यानंतर रोहित शर्माचा आक्रमक फॉर्म 2023 मध्ये पुन्हा पाहायला मिळाला. 2023 मध्ये रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले. यावर्षी रोहित शर्माने विक्रमी 67 षटकार ठोकले आहेत.

Exit mobile version