। मुंबई । प्रतिनिधी ।
भारत विरूद्ध न्यूझीलंड संघात नुकतीच 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 3-0 ने दारूण पराभव केला. यावेळी भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघंही या मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत. दरम्यान, आता या दोन्ही दिग्गजांबद्दल भारताचा माजी दिग्गज खेळाडू क्रिस श्रीकांतने मोठे वक्तव्य केले आहे.
क्रिस श्रीकांतने सांगितले की, जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करत नसेल तर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. श्रीकांत पुढे म्हणाले की, आता प्रत्येकजण असा विचार करू लागला आहे की जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करू शकला नाही तर तो कदाचित कसोटी क्रिकेटला अलविदा करेल. रोहितने आधीच टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि कसोटी क्रिकेट सोडल्यानंतर तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळेल. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो आता जुन्या खेळाडूंमध्ये नाही, हेही लक्षात ठेवावे लागेल.