रोहित शर्माचा निष्काळजीपणा; पुणे पोलिसांची कारवाई

| पुणे | वृत्तसंस्था |

आयसीसी विश्वचषकादरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने भरधाव वेगात कार चालवून नियमबाह्य वर्तन केले. त्यामुळे रोहित शर्माच्या विरोधात तीन चलन तयार झाले असून त्याचा दंड त्याला भरावा लागणार आहे.

पुण्यात बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या कर्णधाराने कार चालवत असताना एक दोनदा नाही तर तीनवेळा कार चालवण्याची वेग मर्यादा ओलांडली. एक्स्प्रेस वे वर वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याने त्याला दंड भरावा लागणार आहे. रोहित शर्माने त्याची स्पोर्ट्स कार वेग मर्यादेपक्षा जास्त वेगाने चालवल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अहमदाबादेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पवन हंस हेलिकॉप्टरने मुंबईला गेला होता. त्याने पुण्याला जाण्यासाठी संघाच्या बस व्यतिरिक्त दुसरा मार्ग निवडला. रोहित त्याच्या स्पोर्ट्स कार लॅम्बोर्गिनी उरुसने पुण्यात पोहोचला.

दरम्यान, रोहितला मुंबईहून पुण्याच्या दिशेने वेगात गाडी चालवल्याबद्दल पुणे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतीय कर्णधाराने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ताशी 200 किमी/प्रतितास वेगाने कार चालवली. त्यातल्या एकदा तर त्याच्या कारने ताशी 215 किमी इतका प्रचंड वेग घेतला होता. नियम मोडून कार चालवल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर दंड म्हणून तीन चलन आकारले आहेत.

Exit mobile version