पॉवरलिफ्टिंगमध्ये रोनकला सुवर्णपदक

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात अकरावी विज्ञान विभागात शिक्षण घेत असलेल्या रोनक रोशन जितेकर या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत 105 किलो वजनी गटातील पॉवरलिफ्टिंग या क्रीडाप्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. महाराष्ट्रातील नामांकित क्रीडासंकुलांना मागे टाकत रोनक जितेकर याने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. यासोबतच राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून निवडही झाली आहे. रोनकच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, विकास देशमुख, रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागीय सल्लागार समितीचे चेअरमन बाळाराम पाटील, महेंद्र घरत, अरुण भगत आदी मान्यवरांनी विशेष कौतुक केले. या यशाबद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश म्हात्रे, उपप्राचार्य प्रो. डॉ. लक्ष्मण गवळी, जिमखाना कमिटीचे चेअरमन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान विभागाच्या इंचार्ज प्रा. सुनिता काटकर, कला विभागाच्या इंचार्ज प्रा. ललिता अवचिते व वाणिज्य विभागाचे इंचार्ज प्रा. सतीश ढगे, क्रीडाशिक्षक संभाजी बढे व जिमखाना कमिटीतील सर्व सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले.

Exit mobile version