। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर व सरपंच चषक दापोली यांच्यावतीने मर्यादित षटकांचे आयोजन करण्यात आले. या सामन्यांचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणात खेळवले जातात यातूनच भविष्यात आपल्या विभागातून तरुण पिढी नक्कीच निर्माण होईल. उत्तम दर्जाचे आयोजन येथे येणार्या सर्व क्रीडा प्रेमींना या सामन्यादरम्यान पाहता येईल याची मला खात्री आहे. असे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. दापोलीच्या सर्व सभासदांना तसेच खेळण्यासाठी आलेल्या सर्व टीमला यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्या सोबत प्रकाशशेठ जितेकर, मोतीराम जितेकर, समाधान घोपरकर, पंकलेश डाऊर, अमोल जितेकर, सचिन जितेकर, अनुज जितेकर, सौरभ जितेकर, प्रशांत जितेकर, राजेश पाटील, चिंतामणी घोपरकर, आकाश पाटील, विकास पाटील, आर.आर.पाटील, निलेश पाटील, रोशन जितेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.