| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व एसबीसी क्रिकेट अकॅडेमी महाडची गुणवान अष्टपल्लू क्रिकेट खेळाडु रोशनी रविंद्र पारधी हिची नुकतीच बीसीसीआय आयोजित एकोणीस वर्षाखालील वूमेन्स चॅलेंजर्स टी -20 क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून एकूण चार मुलींची निवड स्पर्धेसाठी झाली त्यामध्ये रोशनी पारधी, भाविका अहिरे, ईश्वरी आस्वारे, ग्रीशा कटारिया यांचा समावेश करण्यात आला आहे.
रायगडच्या रोशनी पारधी हिची निवड होताच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सदस्य ॲड. पंकज पंडित, प्रदिप खलाटे, संदीप जोशी, प्रशिक्षक तहा चिचकर यांनी रोशनी हिच्या महाड येथील निवास्थानी जाऊन तिचा सत्कार केला. या प्रसंगी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी रोशनी हिच्या सह तिच्या पालकांचे व प्रशिक्षकांचे आवेश चिचकर बशीर चिंचकर यांचे अभिनंदन केले आहे . रोशनी हिने अत्यंत कमी वयात उतुंग भारीरी घेत व खूप कष्ट घेऊन महाराष्ट्राच्या महिला संघात स्थान मिळवले आहे आता तिची निवड बीसीसीआय आयोजित एकोणीस वर्षाखालील वूमेन्स चॅलेंजर्स
स्पर्धेसाठी झाली असल्याने भविष्यात तिची खेळातली कामगिरी उचलून लोवकरच तिची निवड भारताच्या महिला संघात व्हावी अशी समस्त रायगड वासियांची इच्छा असल्याचे अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले. रोशनी पारधी हिचे वडील रविंद्र पारधी यांनी अंत्यत कष्टाने रोशनीला क्रिकेट खेळण्यासाठी पाठिंबा देत असून आपल्या गरिबीवर मात करत रोशनीच्या पाठीमागे खंबीर असल्याने त्यांचा सुद्धा आम्हाला अभिमान असल्याचे पाटील म्हणाले. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन रोशनीला तिच्या भावी वाटचालीसाठी मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बीसीसीआय वूमेन्स चॅलेंजर्स स्पर्धेसाठी रायगडच्या रोशनी पारधीची निवड
