| उरण | प्रतिनिधी |
उरण येथील रोटरी एज्युकेशन सोसायटीचे रोटरी इंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज यांचे बुधवारी (दि.17) वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास महाजन होते. तसेच, स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष विकास महाजन, सचीव यतीन म्हात्रे व इतर मान्यवरांच्या हस्तरण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, हा उद्देश समोर ठेवून हा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या अंगभूत कलांचे सादरीकरण करून उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच, वविध क्षेत्रात विशेष प्राविण्य व गेल्या वर्षी विशेष गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विकास महाजन, सचीव यतीन म्हात्रे, सहसचीव शेखर म्हात्रे, खजिनदार प्रसन्ना कुमार, नरेंद्र पडते, डॉ. बी.व्ही. देवणीकर, मनीष गिरी, राज म्हात्रे, सरिता पडते, मनीषा महाजन, पूजा म्हात्रे, पुष्पा कुरूप, अक्षता घरत, संजिता थळी आदींसह कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.







