| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत रोटरी क्लबकडून तीन शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम बनवून स्मार्ट टीव्ही आणि ई-लर्निंग किट भेट देण्यात आले.
अध्यक्ष सतिश श्रीखंडे यांचा प्रयत्नाने कर्जत तालुक्यातील पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद शाळा किरवली आणि काळभैरव आणि दुसर्या टप्प्यात जिल्हा परिषद शाळा वरणे या शाळांना डिजिटल क्लासरूम साठी स्मार्ट टीव्ही ई लर्निंग किट प्रदान करण्यात आले.
ग्रामीण विभागातील शाळांमधील विदयार्थ्यांना शिक्षण घेताना आवड निर्माण व्हावी. अभ्यास आत्मसात करून प्रगतीसाठी सहाय्य व्हावे म्हणून प्रकल्प राबविला जात आहे. रोटरी क्लब पहिल्या आणि दुसर्या टप्प्यात रायगड जिल्हा परिषद वर्ने आणि किरवली या शाळेतील तसेच काळभैरव माध्यमिक विद्यालयामध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या शाळांमध्ये डिजिटलं क्लासरूम स्मार्ट टीव्ही ई-लर्निंग किट बसवण्यात आले आहेत. तसेच पुढील टप्यात इतर काही शाळांमध्ये सुद्धा या सुविधा देण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषद शाळेच्या वर्णे येथील डिजिटल क्लासरूम अनावरण रोटरी क्लब अध्यक्ष सतीश श्रीखंडे, ट्रेजरर अरविंद जैन, पी आय डायरेक्टर सचिन ओसवाल, दिपचंद जैन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पळसदरी सरपंच जयेंद्र देशमुख, माजी सरपंच मनोहर देशमुख, उपसरपंच शितल देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमाकांत देशमुख, तसेच कविता वाघमारे, केंद्रप्रमुख नयन साळोखे, मुख्याध्यापिका छाया जाधव उपस्थित होते.