| पेण | प्रतिनिधी |
रोटरी क्लब ऑफ पेणचे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन शिगवण व सचिव जयेश शाह यांचा चिल्ड्रेन्स फ्युचर इंडिया संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किशोर देशमुख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पेण अनेक वर्षापासून समाजपयोगी तसेच समाजोन्नतीच्या दृष्टीने विविध कार्यक्रम राबवीत आहे. सदर कार्यक्रमाचा फायदा अनेक लोकांना झालेला आहे. आज सत्कार प्रसंगी रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरीअनसचिन शिगवण यांनी रोटरी क्लब ऑफ पेण व चिल्ड्रेन्स फ्युचर इंडिया संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम करण्याचे आयोजिले आहे.सीएफआय करीत असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये रोटरी क्लब ऑफ पेण सहकार्य देईल असे त्यांनी नमूद केले. तसेच जिथे जिथे समाजातील गरीब मुलांना शिक्षणाचा प्रश्न येईल तेथे रोटरी क्लब ऑफ पेण मदत करील असे आश्वासन दिले.रोटेरीअन जयेश शाह यांनी सीएफआय करीत असलेल्या कामाचे कौतुक करत सीएफआयने केलेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.