कबड्डीत वाघेश्‍वर रोठखुर्द संघ विजेता

। धाटाव । वार्ताहर ।
रोहा तालुक्यात सोनारसिद्ध धाटाव आयोजित कबड्डी सामन्यात रात्री उशिरा पर्यंत झालेल्या अटीतटीच्या सामन्यात वाघेश्‍वर रोठखुर्द संघाने अखेर दमदार बाजी मारली आणि संपूर्ण सामन्यात अंतिम विजेता हा संघ ठरला. अंतिम फेरीत जय बजरंग रोहा संघाला पराजित करून वाघेश्‍वर रोठखुर्द संघ आकर्षक चषकाचा मानकरी ठरत सर्वात अव्वल ठरला. हजारो क्रीड रसिकांच्या साक्षिने असंख्य मान्यवरांच्या उपस्थित या संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान विजेत्या संघाच्या बहाद्दर खेळाडूंसह सहकारी वर्गाने मैदानात जल्लोष केला.
या स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच अशोक मोरे, यशवंत रटाटे, सुदाम रटाटे, सचिन रटाटे, सूर्यकांत मोरे, खेळू रटाटे, बाळकृष्ण रटाटे यांसह मान्यवराच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले. दरम्यान असंख्य मान्यवरांनी यास्पर्धेला हजेरी लावली होती. धाटाव विभागीय कब्बडी स्पर्धेत एकूण 16 संघानी सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेत जय बजरंग रोहा संघ उपविजेता ठरला तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नवतरुण धाटाव व चतुर्थ क्रमांक तलाघर संघाला घोषित करण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत रोठखुर्द संघाच्या आशिष मोरे याला मालिकावीर तर उत्कृष्ट चढाई रोहा संघाच्या सुरज कान्हेकर, उत्कृष्ठ पक्कड मयूर मोरे तर पब्लिक हिरो म्हणून धाटाव संघाच्या संतोष भोकटे याला घोषित करून सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version