| नेरळ | प्रतिनिधी |
आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिवंगत धर्मानंद गायकवाड यांचे बंधू दिनेश गायकवाड यांची आरपीआय आठवले गटाच्या कोकण प्रदेश युवक आघाडी उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
दिनेश गायकवाड हे आरपीआय आठवले गटाचे कर्जत तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांच्या आकस्मिक निधनानंतर दिनेश गायकवाड यांनी संघटनेत मोठी जबाबदारी दिली जाईल असे आश्वासन धर्मानंद गायकवाड यांच्या शोकसभेत यांनी दिले होते. त्यानुसार नेरळ येथील भेटीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिनेश गायकवाड यांना कोकण प्रदेश युवक आघाडी उपाध्यक्ष पदावर नियुक्त केले. या प्रसंगी आरपीआय आठवले गटाचे कोकण प्रदेश युवक आघाडी अध्यक्ष सुशांत सकपाळ जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य सुमित मोरे, युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक कोकण नेते राहुल डालिंबकर, मारुती गायकवाड, कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.