93 हजार 9 विद्यार्थ्यांना आरटीईची लॉटरी

पालकांच्या मोबाईलवर येणार एसएमएस; प्रवेशाची माहिती शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर

| रायगड । सुयोग आंग्रे ।

शहरातील नावाजलेल्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला शिक्षण देण्याचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील पालकांचे स्वप्न पूर्णत्वास जात आहे. उच्च न्यायालयाने जनहित याचिका आणि रिट याचिकेवर 19 जुलैला अंतिम निर्णय दिला आहे. राज्यातील 9 हजार 217 शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी 1 लाख 5 हजार 223 जागासाठी 2 लाख 42 हजार 516 पालकांनी अर्ज सादर केले होते. यापैकी तब्बल 93 हजार 9 विद्यार्थ्यांना आरटीईच्या सोडतीची लॉटरी लागली गेले आहेत. तसे एसएमएस सोमवारपासून पालकांना पाठविण्यात येणार आहेत. ज्या पालकांना एसएमएस आले नाहीत अशा पालकांना बालकांच्या प्रवेशासाठी आता प्राथमिक शिक्षण विभागाने पर्यायी संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षातील 7 जून 2024 रोजी सोडत काढण्यात आली होती. याची निवड यादी व प्रतीक्षा यादी https://student.maharashtra.gov.in/adm_portal येथे पाहायला मिळणार आहे.

आरटीईसाठी पात्र विद्यार्थी
आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील शाळांमध्ये 93 हजार 9 विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे . यामध्ये रायगड 3516 , अहमदनगर 2901 , अकोला 1918 , अमरावती 2300 , औरंगाबाद 4242 , भंडारा 760, बीड 2026 , बुलढाणा 2411 , चंद्रपूर 1402 , धुळे 1102 , गडचिरोली 424, गोंदिया 883 , हिंगोली 754 , जळगाव 2826 , जालना 1756 , कोल्हापूर 2394 , लातूर 1796 , मुंबई 4735 , नागपूर 6648 , नांदेड 2483 , नंदुरबार 298 , नाशिक 4807 , उस्मानाबाद 970 , पालघर 2677 , परभणी 1253, पुणे 16337 , रत्नागिरी 570 , सांगली 1349 , सातारा 1668 , सिंधुदुर्ग 120 , सोलापूर 2194 , ठाणे 9597 , वर्धा 1179 , वाशीम 871 आणि यवतमाळ जिल्ह्यात 1842 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
आरटीईसाठी दाखल प्रस्ताव

आरटीई प्रवेशासाठी यंदा राज्यातील शाळांमध्ये 2 लाख 42 हजार 516 पालकांनी आपले प्रस्ताव सादर केले होते. यामध्ये रायगड 7363 , अहमदनगर 7387 , अकोला 4889 , अमरावती 6626 , औरंगाबाद 15103 , भंडारा 1955, बीड 5800 , बुलढाणा 5386 , चंद्रपूर 3049 , धुळे 2849 , गडचिरोली 883, गोंदिया 3029 , हिंगोली 1846 , जळगाव 7810 , जालना 5128 , कोल्हापूर 3894 , लातूर 5762 , मुंबई 19668 , नागपूर 20343 , नांदेड 8953 , नंदुरबार 880 , नाशिक 14786 , उस्मानाबाद 2410 , पालघर 3660 , परभणी 3145, पुणे 48155 , रत्नागिरी 777 , सांगली 2365 , सातारा 3542 , सिंधुदुर्ग 163, सोलापूर 5281 , ठाणे 19568 , वर्धा 3020 , वाशीम 2047 आणि यवतमाळ जिल्ह्यात 4768 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवारपासून (दि.22) एसएमएस येण्यास सुरुवात होईल. प्रवेश मिळाल्याचा संदेश आलेल्या पालकांनी 23 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 पर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्‍चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी केले आहे.

Exit mobile version