आरटीओच्या ई-प्रणाली नियमाच्या धोरणामुळे अडचण
| पनवेल | वार्ताहर |
रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असून, तिच्यावर वेगमर्यादाचे नियंत्रण आणले जात असल्यामुळे आगामी काळात रुग्णवाहिका सेवा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आरटीओच्या ई-प्रणाली नियमामुळे रुग्णवाहिकाच्या वेगाला लगाम लागणार आहे. या लगामामुळे रुग्णाचा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी रुग्णांना नेताना रुग्ण सिरीयस कंडिशन होण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाण वाढणार आहे. या घडणार्या दुर्घटनेला आरटीओ प्रशासन जबाबदार राहील. त्याची नोंद प्रशासनाने घ्यावी. कारण रुग्णाला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेताना रुग्णवाहिका वेग ई-चलन दंड आकारत आहे. आरटीओ प्रशासनने रुग्णवाहिकांसाठी लागणारे ई-चलन दंड बंद करण्यासाठी गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी महाशक्ती रुग्णवाहिका असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेने केली आहे.
रुग्णवाहिकेला वेगमर्यादा लावल्याने रुग्ण हॉस्पिटला पोहोचायला उशीर होईल. त्यामुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. रुग्ण दगावू शकतो. त्यामुळे आम्ही रुग्णाच्या जीवाशी खेळू शकत नाही. वेगमर्यादेचा रुग्णवाहिकेला दंड आकरण्याच्या नियमाचा निषेध करतो. जर निर्णय बदलला नाही, तर भारतभर रुग्णवाहिकेचे चालक-मालक रस्त्यावर उतरून रुग्णसेवा भारतभर बंद करतील.
– मुकुंद कांबळे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष,
महाशक्ती अॅम्ब्युलन्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य