। पनवेल । प्रतिनिधी ।
रुद्र सचिन शिंदे याने राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत महाराष्ट्र राज्य अंडर 20 गटात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बंगळुरू येथे 24 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर अंडर 20 ॲथलेटिक्स फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत 200 मीटर शर्यतीत 21.26 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली आणि कांस्यपदक पटकावले. याशिवाय 100 मीटर शर्यतीतही 10.59 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत त्याने सहावे स्थान मिळवले.
रुद्र शिंदेचा महाराष्ट्रात नवा विक्रम
