ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपुलकीची मदत

 । रोहा । प्रतिनिधी ।
 रोहा तालुक्यातील प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी मागील 14 वर्ष कार्यरत असणार्‍या आपुलकी संस्थेमार्फत संस्थेचे अध्यक्ष किशोर सोमण, माधुरी बेंद्रे, शेखर सप्रे, भरत जैन यांच्या उपस्थितीत 50 पेक्षा अधिक शाळांना नकाशा सेट,बॅट,बॉल,हँड बॉल,सापशिडी,लगोरी,स्किपिंग रोप्स, हँड रिंग,लेझीम तसेच मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुस्तक संच यांचे वाटप करण्यात आले. स्व. शशिकांत बेंद्रे सर यांनी स्थापन केलेल्या आपुलकी या संस्थेमार्फत आतापर्यंत सुमारे वीस हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. 2007 साली स्थापन झालेल्या या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. बेंद्रे सरांच्या निधनानंतर कोषाध्यक्ष माधुरी बेंद्रे यांनी संस्थेची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. याप्रसंगी स्वाती ताम्हाणे, शुभम ताम्हाणे, नंदकुमार नलावडे तसेच संस्थेच्या प्रसिद्धीची बाजू सांभाळणारे पत्रकार जितेंद्र जोशी तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, संस्था प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version