रशियाच्या हल्ल्यात 74 लष्करी तळ उद्ध्वस्त

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केल़े त्यात 74 लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, 40 सैनिकांसह 10 नागरिक ठार झाल़े या युद्धखोरीचा निषेध करत पाश्‍चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़ या घडामोडींमुळे युद्धाचा झाकोळ जगभर पसरला़ रशियाने युक्रेनवर हल्लासत्र सुरू केल़े सुरूवातीला हवाई हल्ले करून युक्रेनचे लष्करी तळ लक्ष्य करण्यात आल़े त्यानंतर जल आणि भूमार्गे हल्ले सुरू झाल़े रशियन सैन्याची वाहने क्रिमियामार्गे युक्रेन सरकारनियंत्रित भागांत घुसविण्यात आली़ युक्रेनमधील हवाई तळांसह 74 लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा रशियाने केला़

Exit mobile version