रशियाची दोन शहरात युद्धबंदीची घोषणा

नागरिकांना बाहेर पडण्यासाठी कॉरिडॉर
। कीव्ह । वृत्तसंस्था ।
रशियानं युक्रेनच्या मारियुपोल आणि वोल्नोवाखा या दोन शहरांत तात्पुरत्या स्वरुपात सीझफायरची घोषणा केली आहे. नागरिकांना शहरातून बाहेर पडण्यासाठी सुरक्षित कॉरिडोर उपलब्ध करून देण्याचं रशियाकडून सांगण्यात आले आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयातकडून याची पुष्टी करण्यात आली आहे.

स्थानिक वेळेनुसार, 10 वाजता नागरिकांना सुरक्षितरित्या शहरांतून बाहेर पडण्यासाठी संबंधित दोन शहरांत सुरक्षित कॉरिडोर उपलब्ध करून दिला जाईल. या वेळेत रशियाकडून गोळीबार केला जाणार नाही, रशियानं युक्रेनियन नागरिकांना आपलं शहर सोडण्याचं आवाहन केले आहे. युक्रेनच्या मोक्याच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बंदर असलेल्या मारियुपोल शहराच्या महापौरांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्यानं मारियुपोलची नाकाबंदी केली आहे.

दुसरीकडे, युक्रेनकडून रशियावर निर्बंध घालण्याचं आवाहन करण्यात आले आहे. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी सिंगापूरच्या रशियन सेंट्रल बँक आणि इतर काही रशियन बँकांवर निर्बंध लादले आहेत. सोबतच, युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यावरून रशियाला निर्यात होणार्‍या वस्तूंवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

Exit mobile version