रशियन शिष्टमंडळाची एलिफंटा लेण्यांना भेट

| उरण | वार्ताहर |

तालुक्यातील सुप्रसिद्ध जागतिक कीर्तीचे समजले जाणाऱ्या घारापुरी बेटावरील लेण्यांना दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक भेट देत असता. घारापुरी येथे रशियन शिष्टमंडळाच्या 12 सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली. जयाप्रसंगी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच बळीराम ठाकूर व सदस्य यांनी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे स्वागत केले. एलिफंटा बेटावर असलेल्या लेण्यांमधील शिवाच्या अनेक कलाकृती विविध रुपात पाषाणात कोरण्यात आली आहेत. या कलाकृती, लेण्यांची आणि बेटावरील विकासाची माहिती उपसरपंच बळीराम ठाकूर शिष्टमंडळाला दिली.

घारापुरी बेट हे मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर तर रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहे. भगवान शंकराला समर्पित असलेल्या या लेण्यांमध्ये शिवाच्या तीन भव्य मूर्ती पहायला मिळतात. शिष्टमंडळाने बेटावरील लेण्यांचे दर्शन घेतल्यानंतर ते भारावून गेले. तसेच ग्रामपंचायतीने केलेल्या पाहुणचाराबद्दल आभार व्यक्त केले.

Exit mobile version