सचित्रा सेनानायके अटकेत

| श्रीलंका । वृत्तसंस्था । 

जानेवारी 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या स्टार खेळाडूला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सचित्रा सेनानायके  असं या खेळाडूचं नाव असून श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला वादग्रस्त बॉलिंग अॅक्शनमुळे सेनानायके चागंलचा चर्चेत आला होता.

मॅच फिक्सिंगच्या आरोपात अटक
क्रीडा खात्याताली भ्रष्टाचार समितीने माजी क्रिकेट सचित्रा सेनानायकेला अटक केली. तीन आठवड्यांपूर्वीच न्यायालयाने त्याचा देश सोडून जाण्यावर बंदी घातली होती. 2020 मध्ये लंका प्रीमिअर लीगमध्ये मॅच फिक्स करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. दोन खेळाडूंना टेलिफोनवर मॅच फिक्सिंग करण्यासाठी सेनानायकेने प्रोत्साहित केलं होतं.

Exit mobile version