सदानंद गायकर यांचा सत्कार

| नागोठणे | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य भातगिरणी संस्था असलेल्या नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी संस्थेच्या सभापतीपदी नागोठणेजवळील पाटणसई येथील रोहा पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर सदानंद गायकर यांच्यावर नागोठणे शहर व विभागातील विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव सुरुच आहे.

दरम्यान, सदानंद गायकर यांच्या पाटणसई गावातील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नागोठणे विभाग सहकारी भात गिरणी संस्थेच्या कार्यालयात शाल व श्रीफळ देऊन सदानंद गायकर यांचा सत्कार केला. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष राणे, माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कोतवाल, नागोठणे विभाग कबड्डी असोसिएशन अध्यक्ष हनुमान जोशी, राजेंद्र गायकर, राजेंद्र जोशी, विश्‍वास गायकर आदी पाटणसई ग्रामस्थांसह संस्थेचे सचिव अनिल पवार उपस्थित होते.

Exit mobile version