आयकरचा सागर कातुर्डे “भारत श्री”

 रेल्वे स्पोर्टसला सांघिक विजेतेपद, सर्वाधिक 3 सुवर्ण जिंकणारा तामिळनाडू उपविजेता

मुंबई | प्रतिनिधी |

करोनाच्या महासंकटामुळे वारंवार लांबणीवर पडणारी 13 वी राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव अर्थातच भारत श्री स्पर्धा मोठ्या दणक्यात तेलंगणाच्या खम्मम शहरात पार पडली आणि भव्य दिव्य आयोजित झालेल्या या स्पर्धेत आयकर खात्याच्या सागर कातुर्डेने संस्मरणीय कामगिरी करीत भारत श्रीचा बहुमान संपादला. भारत श्रीच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या द्वंद्वात सागरसमोर अत्यंत कडवे आव्हान होते. तेव्हा सागरने आपल्या पीळदार पोझेसनी जजेसना मोहित केले आणि तामिळनाडूच्या एम.  सर्वानन आणि आर. कार्तिकेश्वर या तगड्या खेळाडूंवर मात करीत पहिल्यांदा भारत श्री स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स होण्याचा भीमपराक्रम केला. स्पर्धेपूर्वी साऱ्याच्याच मनात धाकधुक होती. दुसरीकडे पुन्हा एकदा करोनाचे संकट गहिरे होत चालले होते. स्पर्धा होणार की नाही ? याबाबत शंका होतीच, पण करोना खम्मम शहरापासून लांब असल्यामुळे आयोजक इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनने फक्त स्पर्धाच आयोजित केली नाही तर डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन  केले. या आयोजनात  हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष खम्मम शहरवासियांनी प्रथमच अनुभवता आला. त्यामुळे स्पर्धेचं सारं काही अद्वितीय, संस्मरणीय होतं. अशा या दिमाखदार भारत श्री स्पर्धेत सागरचे यशही डोळे दिपवणारे असेच होते. करोनामुळे नुकत्याच उझबेकिस्तान येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत सागर खेळू शकला नव्हता. मात्र भारत श्री स्पर्धेत तो आपल्या सर्वोत्तम कामगिरीसाठी उतरला. त्याने कोणतेही ध्येय डोळ्यासमोर ठेवले नव्हते. पण त्याच्या परिश्रमाने त्याला अनोखे “जेतेपदाचे फळ” जिंकून दिले. आजवर सागर कोणत्याही मोठ्या स्पर्धेत फक्त आपल्या 80 किलो वजनी गटात विजेता व्हायचा, पण आज त्याने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. किताबाच्या लढतीत दहा गटविजेते असले तरी त्याची खरी लढत तामिळनाडूच्याच सर्वानन आणि कार्तिकेश्वरशी झाली आणि या लढतीत त्यानेच बाजी मारली.
महाराष्ट्राच्या तौसिफला सुवर्ण
या स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू मोठ्या संख्येने होते, पण अनेक नामांकित नावे गायब असल्यामुळे राज्याचा संघ उपस्थिती दाखविण्यासाठी गेला असल्याचे चित्र समोर आले. 70 किलो वजनी गटात तौसिफ मोमीन हा खेळाडूच सोने जिंकू शकला. गतवर्षी महाराष्ट्र श्री ठरलेला महेंद्र चव्हाण 90 किलो वरील गटात दुसरा आला. याव्यतिरिक्त फिटनेस फिजीक गटात अचल कडवेने बाजी मारली.
आयकर खात्यासाठी आंतरराष्ट्रीय यश मिळवून द्यायचे आहे – सागर कातुर्डे
मी जे यश मिळविले आहे त्यात सिंहाचा वाटा माझे कुटुंब, यूजेनिक्स न्यूट्रिशन आणि आयकर खात्याचा आहे. यूजेनिक्सच्या चिराग भट यांनी मला आर्थिक आणि मानसिक बळ दिल्यामुळे मी हे यश मिळवू शकलो आहे. तसेच मला आता यापेक्षा मोठी कामगिरी करायची आहे. मला माझी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. आयकर खात्यासाठी जे आजवर कुणी करू शकलं नाही ते करण्यासाठी मला घाम गाळायचा आहे. मला माझ्या आयकर विभागाची नेहमीच साथ लाभली , पण रेल्वे जसे आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देतं, पाठिंबा देतं. तशी साथ मला त्यांची लाभली तर माझी कामगिरी आणखीन सरस होऊ शकते. मला माझ्या आयकर खात्याला आंतरराष्ट्रीय यश मिळवून द्यायचे आहे, असा विश्वासही सागर कातुर्डेने विजयानंतर व्यक्त केला. 

आयकर स्पोर्ट्स क्लबमध्ये आनंदाचे वातावरण
सागरच्या यशामुळे आयकरच्या स्पोर्टस् आणि रिक्रेएशन क्लबची छाती अभिमानाने फुगली आहे. या आधी आयकर विभागासाठी इतकी जबरदस्त कामगिरी कुणीच केली नव्हती. प्रतिष्ठेच्या भारत श्री स्पर्धेत किताब विजेतेपद पटकावणारा सागर कातुर्डे हा पहिलाच शरीरसौष्ठवपटू ठरला आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या या वीराचे जंगी स्वागत आणि कौतुक करणार असल्याची माहिती यांनी स्पोर्ट्स आणि  रिक्रेएशन क्लबचे सरचिटणीस वीरेंद्र पेडणेकर आणि विजय झगडे यांनी दिली.  

भारत श्री 2021 शरीरसौष्ठव स्पर्धेचा निकाल
55 किलो वजनी गट : 1. सुरज के. के. (केरळ), 2. जगत ज्योती पाबर्ती (रेल्वे स्पोर्टस्), 3. नीता सिंग (मणिपूर), 4. जॉन बुश सिंग (तेलंगणा), जी धायलन (तामिळनाडू).60 किलो वजनी गट : 1. वैभव महाजन (रेल्वे स्पोर्टस्), 2. भूपिंदर सिंग (रेल्वे स्पोर्टस्), 3. रोनिकांता मैतेई ( सेनादल), 4. आरकेएम तोंबा (सेनादल), 5. एम. विघ्नेश (तामिळनाडू).  65 किलो वजनी गट : 1. प्रदिपकुमार वर्मा (पंजाब), 2. परिक्षित हजारिका (आसाम), 3. विचित्र नायक (ओडिशा), 4. अजीत सिंग जामवाल (जम्मू-काश्मीर), 5. राजू खान (बिहार). 70 किलो वजनी गट : 1. तौसिफ मोमीन (महाराष्ट्र), 2. शशी (दिल्ली), 3. संदीप (दिल्ली), 4. महीप कुमार (रेल्वे  स्पोर्टस्), 5. आशिष मान ( आयकर). 75 किलो वजनी गट : 1. सी. राहुल (रेल्वे स्पोर्टस्), 2. अनिश कुमार ( सेनादल), 3. अश्विन शेट्टी (रेल्वे स्पोर्टस्), 4. जगन्नाथ खुंटिया (ओडिशा), 5. आशिष लोखंडे (महाराष्ट्र). 80 किलो वजनी गट : 1. सागर कातुर्डे (आयकर), 2. सर्बो सिंग (रेल्वे स्पोर्टस्), 3. प्रशांत नायक (उत्तर प्रदेश), 4. गणेश यादव (रेल्वे स्पोर्टस्), 5. दादासाहेब शिंदे ( महाराष्ट्र). 85 किलो वजनी गट : 1. के.कार्तिकेश्वर ( तामिळनाडू), 2. निलकांता घोष (प. बंगाल), 3. मोहम्मद अशपाक (रेल्वे स्पोर्टस्), 4. श्रीकांत सिंग (उत्तर प्रदेश), 5. संदीप उले ( महाराष्ट्र).
90 किलो वजनी गट : 1. एम. सर्वानन (तामिळनाडू), 2. मॅराडोना छेत्री (मणिपूर), 3. देवेंदर पाल (उत्तर प्रदेश), 4. आय देवा सिंग ( सेनादल), 5. मोहन सुब्रमणियम (रेल्वे स्पोर्टस्). 90-100 किलो गट: 1. पवन कुमार (सेनादल), 2. महेंद्र चव्हाण (महाराष्ट्र), 3. प्रेमित (सीआरपीएफ), 4. अमन राणा (पंजाब), 5. अजय पुंदिर (उत्तराखंड). 100 किलोवरील गट : 1. नितीन चंडिला (हरयाणा), 2. जावेद अली खान (रेल्वे स्पोर्टस्), 3. निलेश दगडे (महाराष्ट्र), 4. मुकेश चौधरी (आयबीबीएफ). 5. सुमीत सेठी ( हरयाणा). स्पोर्टस् फिजीक (पुरूष-165 सेमीपर्यँत) : 1. संतोष जीपी (पुद्दुचेरी), 2. एस. विघ्नेश्वरन (तामिळनाडू), 3. मो. शहजाद ( उत्तर प्रदेश), 4. संदीप नवलेकर ( कर्नाटक), 5. संदिप बसोया (दिल्ली). फिटनेस फिजीक (पुरूष- खुला गट)) : 1. आचल कडवे (महाराष्ट्र), 2.जॉयजीत वाइखोम (मणिपूर), 3. आकाश आवटे (महाराष्ट्र), 4. विशाल आवटे (महाराष्ट्र), 5. नैबाम रॉबर्ट सिंग (मणिपूर) स्पोर्टस् फिजीक (पुरूष- 165 सेमीपर्यँत) : 1. मोहन सुंदरम (तामिळनाडू), 2. स्वामी दास (तामिळनाडू), 3. सचिन चौहान (दिलल), 4. संबथ कुमार (तामिळनाडू), 5. पंकज रावत (चंदिगड).
स्पोर्टस् फिजीक (पुरूष- 165 सेमीपर्यँत) : 1. मोहना सुंदरम (तामिळनाडू), 2. स्वामी दास (तामिळनाडू), 3. सचिन चौहान (दिलल), 4. संबथ कुमार (तामिळनाडू), 5. पंकज रावत (चंदिगड).
ऍथलीट फिजीक ( पुरूष-खुला गट) : 1. अब्दुल कादिर खान ( उत्तर प्रदेश), 2. केनेलिली (नागालंड), 3. लोकेश यादव ( आयबीबीएफ), 4. राहुल बिश्त ( आयबीबीएफ), 5. जॉयजीत वाइखॉम ( मणिपूर).
बेस्ट पोझर :  एस. कृष्णा राव ( भारतीय पोस्ट), सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू : नितीन चंडिला (हरयाणा)सांघिक उपविजेतेपद : तामिळनाडूसांघिक विजेतेपद : रेल्वे स्पोर्टस् भारत श्री उपविजेता   :  एम. सर्वानन (तामिळनाडू).भारत श्री किताब विजेता  : सागर कातुर्डे (आयकर)

Exit mobile version