पालकमंत्र्यांचे तोंडी आश्वासन
। अलिबाग । वार्ताहर ।
सागरगड- माची येथील आदिवासी वाडीला भौतिक सुविधा मिळाव्यात, आदिवासी वाडीच्या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर झालेला 49 लाखांचा निधी खर्ची करावा,या मागणीसाठी येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांच्या नेतृत्वात्वाखाली महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या उपोषणात डॉ. शिवकर, नागेश कुळकर्णी, मुश्ताक घट्टे , आदिवासी नेते भगवान नाईक खंडाळ सरपंच रंजना रविंद्र नाईक राजेश मेहतर, प्रफुल्ल वालेकर विलास चौलकर, प्रा. रामदास पाडगे , हरिश्चंद्र वालेकर , उदय काटले, राजेंद्र वालेकर, चंद्रकांत वालेकर गजेंद्र दळी, बाळकृष्ण पाटील, संदीप पाटील,अ. प्र. देशमुख,प्रदीप पाटील इ. 200 ग्रामस्थ सहभागी झाले आदिवासी सहभागी झाले होते. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चौकशी केली. वालेकर यांनी आदिवासी वाडीच्या रस्त्यासाठी 13 वर्षांपूर्वी मंजूर झालेला निधी विद्यमान मूल्यांकनानुसार खर्ची पडावा तसेच राज्यपाल महोदयांच्या आदेशाचे पालन जिल्हा प्रशासनाकडून व्हावे असे सूचित केले. यावेळी मंजूर निधी खर्च करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. अशी आश्वाने नेहमीच मिळतात. परंतु लेखी आश्वासन न दिल्यामुळे उपोषणकर्ते नाराज झाले.