दुसऱ्या कसोटीसाठी सांहेबांचा संघ जाहीर

| विशाखापट्टणम | वृत्तसंस्था |

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम इथं खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघाने सामन्याच्या एक दिवस आधीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केलीय. या सामन्यासाठी त्यांनी आपल्या संघात दोन बदल केले आहेत. दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन यादी जाहीर केलीय. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडनं आपल्या संघात दोन बदल केले आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचं पुनरागमन झालंय, तर फिरकी गोलंदाज शोएब बशीरला पदार्पणाची संधी मिळाली आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडचा संघ 1-0 नं आघाडीवर आहे.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : झॅक क्रॉऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, जॉनी बेअरस्टॉ, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टिरक्षक), रिहान अहमद, टॉम हर्टली, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन
Exit mobile version