एशियन थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये साहिल सिनारे याला सुवर्णपदक

। भाकरवड । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील दुंदरे गावचे साहिल हनुमान सिनारे यांनी एशियन थाई बॉक्सिंगमध्ये द्राबाद येथील सरोरनगर इंदोर स्टेडियममध्ये भारताचा प्रतिनिधित्व करत खुल्या स्पर्धेत मधील 19 ते 100 वयोगटातील सुवर्णपदक पटकावल्या बद्दल पनवेल तालुक्यातील दिगग्ज मान्यवरांच्या हस्ते भव्य दिव्य स्वागत सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
दि.3 ते 6 डिसेंबर 2021 रोजी एशियन थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिप पार पडल्या. त्यात जवळपास सहा देशातील खेळाडू बरोबर मॅचेसमध्ये झाल्या. त्यामध्ये श्रीलंका, भूतान, जपान, बांगलादेश, इंडोनेशिया, थायलंड या देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये साहिलने सहा राऊंड घेत सुवर्णपदक मिळवून रायगड जिल्हा व पनवेल तालुक्यातीळ दुंदरे गावचा नाव सातासमुद्रापार केल्याने सर्वांनी साहिल व त्यांच्या आई वडिलांवर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Exit mobile version