बारा सुवर्णपदकांसह एशियन कपचा मानकरी
| चिपळूण | प्रतिनिधी |
दुसरी माऊंट एव्हरेस्ट, साऊथ इंडियन डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप काठमांडू-नेपाळ येथे (दि.1) पार पडली. चिपळूणच्या डायडाज डान्स स्टुडिओमधील विद्यार्थ्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना 12 सुवर्णपदकांची कमाई केली. या कामगिरीच्या जोरावर एशिनयन कपदेखील पटकाविला.
या स्पर्धेत मालदीव, श्रीलंका, भूतान, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान व भारत यांच्यामध्ये नृत्याची टक्कर झाली. यामध्ये सोलो फ्रेस्टाइल कॅटेगिरीमधील सहा वर्षाखाली आहाना पवार सुवर्णपदक, हिप हॉप सहा वर्षाखाली सिया शिर्के सुवर्णपदक, फ्री स्टाईल दहा वर्षाखाली राधा मोहिते सुवर्णपदक, फोक या प्रकारात सात ते आठ वर्षाखाली रेहांशी दांडेकर तसेच तेरा ते पंधरा वर्षे वयोगटांमध्ये इंटरनॅशनल कंटेम्परी स्टाईलमध्ये साद शेख सुवर्णपदक प्राप्त केले. तर हिप हॉप या कॅटेगरीमध्ये 14 वर्षाखालील ग्रुपमध्ये संपूर्ण आशिया खंडामधून एशियन कपचे मानकरी ठरलेले तसेच बारा सुवर्णपदक विजेते सिया शिर्के, स्वरांजली निमकर, अंतरा भुवड, नीती चौधरी, अदिती खेराडे, साद शेख, साईराज महाडिक यांनी भारतीय संघाकरिता सुवर्णपदक घेऊन एशियन कपचे मानकरी ठरले.
या सर्व विद्यार्थ्यांना परफॉर्मिंग आर्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक रजनीकांत ठाकूर व भारतीय संघाचे कोच व डायडाज डान्स स्टुडिओ चे संचालक सूरज जाधव यांनी मार्गदर्शन केले.