साहित्य अकादमी युवाचा ‘देवबाभळी’ला पुरस्कार

प्राजक्त देशमुख ठरले मानकरी
मुंबई | प्रतिनिधी |
साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणार्‍या साहित्य अकादमी युवा पुरस्काराचे 2020 सालचे मानकरी ठरले आहेत मराठमोळे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख. त्यांच्या देवबाभळी या पुस्तकासाठी प्राजक्त यांना हा सन्मान मिळाला आहे. प्राजक्त यांचं संगीत देवबाभळी हे नाटकही फार प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरलं आहे.
दरवर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकांना त्यांच्या पुस्तकासाठी प्रदान करण्यात येतो. ताम्रपत्र तसंच 50,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. 2020 चा हा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना मिळाला आहे. समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचाही समावेश आहे. त्यांच्यासोबतच आशा बागे आणि लक्ष्मीकांत देशमुख या तज्ज्ञांनीही या पुरस्कारासाठी काम पाहिलं.

Exit mobile version