नाशिकमध्ये उद्यापासून साहित्य संमेलन

। नाशिक । वृत्तसंस्था ।
नाशिकमध्ये होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बहुचर्चित कार्यक्रम पत्रिका अखेर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार 3 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर, मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रमुख पाहुणे गीतकार जावेद अख्तर आणि उद्घाटक साहित्यिक विश्‍वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. संमेलनाचा समारोप 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Exit mobile version