। नाशिक । वृत्तसंस्था ।
नाशिकमध्ये होणार्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची बहुचर्चित कार्यक्रम पत्रिका अखेर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार 3 डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता संमेलन अध्यक्ष जयंत नारळीकर, मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रमुख पाहुणे गीतकार जावेद अख्तर आणि उद्घाटक साहित्यिक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यापूर्वी सकाळी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथून ग्रंथदिंडी निघणार आहे. संमेलनाचा समारोप 5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. 3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. ग्रंथदिंडी निघेल. संमेलनस्थळी सकाळी 11.00 वा. ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. दुपारी 4.00 वाजता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन होईल. दुसरा दिवशी सकाळी प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत व प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांची प्रकट मुलाखत तर दुपारच्या सत्रात ङ्गस्मृतीचित्रे:लक्ष्मीबाई टिळकफ या विषयावर परिचर्चा आयोजित केली आहे. सायंकाळी कोरोनानंतरचे अर्थकारण व मराठी साहित्य व्यवहार या विषयावर जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. तिसरा दिवशी परिसंवाद : सकाळी ङ्गमराठी नाटक – एक पाऊल पुढे, दोन पावले मागेफ शफ़ाअत खान यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दुपारी साहित्य निर्मितीच्या कार्यशाळा : गरज की थोतांड-डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या परिसंवादामध्ये वृषाली देशपांडे, डॉ. भगवान कारे, डॉ. वृंदा भार्गवे, इब्राहिम अफ़गाण, प्रा. भास्कर ढोके यांचा सहभाग असेल.
साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर
