रायगड जिल्हा महिला व्हॉलीबॉल स्पर्धेत सेंटमेरी संघ अलिबाग विजेता

। खारेपाट । वार्ताहर ।
रायगड जिल्हा महिला व्हॉलिबॉल स्पर्धेत सेंटमेरी संघ अलिबाग विजेता ठरला तर उपविजेता पनवेल महिला संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशन रायगड जिल्हा यांच्या मान्यतेने अमित नाईक मित्र मंडळ, सारळ आद्य सप्लायर्स चषक 2021 या स्पर्धेत सेंट मेरिज कॉन्व्हेट हायर सेकंडरी स्कुल अलिबाग महिला संघाच्या कर्णधार सुष्मा धुमाळ, योगिता भोईर, ओजस्वीनी कदम, रुपाली चव्हान, आर्या पाटील, नहीजा म्हात्रोजी, नयनिका गायकवाड, प्रचिती नाईक, आस्वारी म्हात्रे, निधी गायकवाड, पुजा बांदविडेकर, संघ नायक यतीराज पाटील, संघव्यवस्थापक आदित्या भोईर यांचा पोलिस अधिकारी राजिव पाटील यांच्या हास्ते पारितोषिक वितरण देऊन सन्मान करण्यात आला.

Exit mobile version