। खारेपाट । वार्ताहर ।
आलिबाग तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय हाशिवरे येथील पटांगणात डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशन रायगड जिल्हा यांच्या मान्यतेने स्व.काँग्रेस नेते व माजी आ.मधुकर ठाकुर क्रिडा नगरीत डायरेक्ट हॉलिबॉल स्पर्धा असोसिएशन रायगड जिल्हा यांच्या मान्यतेने अमित नाईक मित्र मंडळ, सारळ आद्य सप्लायर्स, म्हात्रोली आयोजित दुसरी जिल्हा आजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलिबॉल स्पर्धा, आद्य सप्लायर्स 2021-22 पुरुष-महिला गटांचे भव्य सामने संपन्न झाले.
या स्पर्धेत बोर्ली मांडला संघाने बाजी मारली असून उपविजेता मॉडेल ऐज पेण संघ ठरला, तृतीय क्रमांक मॉडेल संघ राजंणखार, चतृर्थ क्रमांक सेवन स्टार बोर्ली संघ, तसेच महिला गटात सेंट हायर सेकेंडरी कॉन्व्हेंट स्कूल अलिबाग महिला गटात प्रथम क्रमांकांचा मानकरी ठरला. तर उपविजेता पनवेल तालुका डायरेक्ट व्हॉलिबॉल संघाने बाजी मारली.
या स्पर्धेत रायगड जिल्हा रा.जि.प. सभापती दिलीप भोईर, अॅड.प्रविण ठाकूर सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, राजिव पाटील पोलीस निरीक्षक मांडवा, उद्योजक अमित नाईक, चारूहास मगर, चंद्रकांत मोकल आदींच्या हस्ते खेळाडूं अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वे उपस्थित मान्यवरांचे स्वागत अमित नाईक मित्र मंडळ सारल यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी चंद्रकांत मोकल अध्यक्ष, महा.अंबा.उत्पादक संघ, राजा ठाकूर काँग्रेस नेते, सुनील थळे ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष, रवि ठाकूर काँग्रेस नेते, रवी म्हात्रे, महेश माने, निशिकांत मोकल, अॅड.प्रफुल्ल पाटील, शंकर मोकल,ि हरामन भोईर, पंच अध्यक्ष प्रसंन्न पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.